Chapter : 10 गृहनिर्माण क्षेत्रावर परिणाम करणारे घटक (मॅक्रो / दीर्घ घटक) : शासकीय ध्येय-धोरणे

मित्रांनो

शासकीय धोरणे, कायदे व नवीन उपक्रमांचा गृहनिर्माण क्षेत्रावर मोठा परिणाम होतो.

खरेदीदारांची मानसिकता, ग्राहकांचा कल व विश्वास, गृह कर्जावरील व्याजदर, इज ऑफ डूइंग बिजनेस, मेक इन इंडिया कॅम्पेन, जमिनीची उपलब्धता, तरलता व कर्ज पुरवठा तसेच रेरा कायदा, नोटबंदी, जीएसटी व अफॉरडेबल हाऊसिंग स्कीम्स इत्यादी योजनांमुळे गृह खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढतो.

गृहनिर्माण क्षेत्राचे नियमन व ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी शासकीय स्तरावर केलेली पुनर्रचना व आवश्यक ती अंमलबजावणी यामुळे आपसूकच ग्राहकांचा विश्वास अधोरेखित होण्यामध्ये मदत होते.

पुढील लेखामध्ये आपण मॅक्रो / दीर्घ इकॉनोमिक घटकांपैकी थेट परकीय गुंतवणुकीचा परिणाम पाहूया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

Chapter : 9 गृहनिर्माण क्षेत्रावर परिणाम करणारे घटक (मॅक्रो / दीर्घ घटक) : स्टॉक मार्केट

मित्रांनो

जेव्हा जेव्हा स्टॉक मार्केट खूप बुलिश म्हणजेच वर वर जाणारे असते तेव्हा मार्केटचा कोणताही भरवसा नसल्यामुळे तसेच मार्केट क्रॅश होण्याचा धोका अतिशय तीव्र असल्यामुळे ग्राहक गृहनिर्माण क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास पसंती देतात.

त्याचबरोबर बँका आणि वित्तीय संस्था यादेखील व्याजदर कमी करून घर घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करतात त्या अनुषंगाने जास्तीचा पैसा गृहनिर्माण क्षेत्रामध्ये ओतल्यामुळे घराची मागणी वाढते.

सद्यस्थितीला स्टॉक मार्केट रोज नवे उच्चांक गाठत आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी प्रॉफिट बुक करून लोक मार्केट मधून बाहेर पडतील आणि उपलब्ध पैसा गृहनिर्माण क्षेत्रामध्ये ओतला जाईल आणि त्या अनुषंगाने घरांची मागणी पुन्हा एकदा वाढेल.

पुढील लेखामध्ये आपण मॅक्रो / दीर्घ इकॉनोमिक घटकांपैकी शासकीय ध्येय-धोरणांचा परिणाम पाहूया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

Chapter : 8 गृहनिर्माण क्षेत्रावर परिणाम करणारे घटक (मॅक्रो / दीर्घ घटक) : व्याजदर

मित्रांनो

कमी व्याजदर म्हणजेच कर्ज घेण्यासाठी येणारा कमी खर्च म्हणजेच घरांसाठीची वाढणारी मागणी आणि त्याविरुद्ध जास्त व्याजदर म्हणजे कर्ज घेण्यासाठी येणारा जास्तीचा खर्च म्हणजेच घरांसाठीची घटणारी मागणी.

एकूणच वाढणारे किंवा घटणारे व्याजदर हे कोणत्याही गुंतवणूकदाराला घर घ्यायचे की नाही याबाबत सल्ला देतात. व्याजदर कमी असेल तर ग्राहकांचा आपसूकच घर विकत घेण्यासाठी ओढा वाढतो.

आज रोजी 8.50 % ते 8.75 % या इतक्या अत्यल्प वार्षिक व्याज दराने सर्व बँका तसेच वित्तीय संस्था इक्विटेबल मोर्गेज ची सुविधा देऊन घर घेण्यास ग्राहकांना अतिशय उत्तम संधी देऊ पाहत आहेत. ग्राहकांनी याचा नक्की विचार करावा.

पुढील लेखामध्ये आपण मॅक्रो / दीर्घ इकॉनोमिक घटकांपैकी स्टॉक मार्केट चा परिणाम पाहूया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

Chapter : 7 गृहनिर्माण क्षेत्रावर परिणाम करणारे घटक (मॅक्रो / दीर्घ घटक) : रोजगार

मित्रांनो

रोजगारातील वाढ म्हणजेच दरडोई उत्पन्नातील वाढ. म्हणजेच वाढणारे खर्चण्याजोगे उत्पन्न व परवडण्याची क्षमता विकसित होणे की ज्यामुळे घराची मागणी वाढते तसेच गृह कर्जाचे हप्ते थकवणे कमी होऊन जाते.

त्यामुळे रोजगाराच्या संधी जेवढ्या वाढतील तेवढे शहरीकरण वेगाने वाढेल आणि हेच कारण आहे की ग्रामीण भागामध्ये घरांची मागणी अत्यंत नगण्य आहे.

रोजगार वाढणे म्हणजेच अर्थव्यवस्था आरोग्यदायी असणे आणि रोजगार वाढीचा दर खराब असल्यास सरकारला जास्त कर्ज घ्यावे लागते. त्यामुळे वित्तीय तूट येण्याचा धोका बळावतो व परिणामतः घरांच्या मागणीवर व पायाभूत सेवा क्षेत्राच्या विकासावर थेट परिणाम दिसून येतो.

पुढील लेखामध्ये आपण मॅक्रो / दीर्घ इकॉनोमिक घटकांपैकी व्याजदरांचा परिणाम पाहूया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

Chapter : 6 गृहनिर्माण क्षेत्रावर परिणाम करणारे घटक (मॅक्रो / दीर्घ घटक) : वाढती लोकसंख्या

मित्रांनो

वाढणारी लोकसंख्या म्हणजे गृहनिर्माण क्षेत्राची वाढती मागणी. शिक्षण तसेच नोकरीच्या संधीमुळे टीयर 1 व टीयर 2 शहरांमध्ये घरांची आवश्यकता वाढलेली आपण पाहिलीच आहे मग ती आवश्यकता स्वतः घर घेऊन राहण्याची असो किंवा भाड्याने घर घेऊन राहण्याची असो. घर हे हवेच.

जिल्ह्याची मुख्यालये व तालुक्याची ठिकाणे म्हणजेच टीयर 3 व टीयर 4 शहरे देखील या गोष्टीला अपवाद नाहीत.

उदा. धाराशिव, तुळजापूर, लातूर, कळंब, इ.

आज रोजी शिक्षण तसेच नोकरीनिमित्त ग्रामीण भागातून बाहेर येऊन जिल्हा मुख्यालय व आसपासचे मोठे शहर याकडे येणाऱ्या लोकांचा ओढा खूप मोठा आहे व त्यानुसार लोकांची घराची वाढणारी गरज कायम राहणार आहे.

त्याचप्रमाणे बदलते समाज जीवन ज्यामध्ये विभक्त कुटुंब पद्धती तसेच बदलणारी शहरे व शहरीकरणातून वेग घेणारी जीवनशैली यामुळे नवीन घरांची मागणी ही प्रचंड प्रमाणावर वाढत आहे.

पुढील लेखामध्ये आपण मॅक्रो / दीर्घ इकॉनोमिक घटकांपैकी रोजगाराचा परिणाम पाहूया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

Chapter : 5 गृहनिर्माण क्षेत्रावर परिणाम करणारे घटक (मॅक्रो / दीर्घ घटक) : इन्फ्लेशन

मित्रांनो

इन्फ्लेशन (चलनवाढ) म्हणजेच वस्तू व सेवांची कायमस्वरूपी एका विशिष्ट वेगाने होत असलेल्या किमतीतील वाढ जी एका विकसित तसेच विकसित देशाला अनिवार्य असते.

इन्फ्लेशन म्हणजेच चलनवाढीचा दर जास्त असेल तर गृहनिर्माण क्षेत्रातील परताव्याचा दर कमी असतो.

इन्फ्लेशन वाढत असेल तर भारतीय रिझर्व बँकेला व्याजदरामध्ये वरच्या दिशेला दुरुस्ती करावी लागते ज्यामुळे गृह कर्जाचे व्याज दर वाढतात आणि गृह खरेदी ही अधिक महाग बनून जाते.

आजमितीला चलनवाढ आटोक्यात असल्यामुळे आणि रिझर्व बँकेने रेपो आणि रिव्हर्स रेपो दर स्थिर ठेवल्यामुळे गृह कर्जावरील व्याजदर हे अत्यंत नगण्य पातळीवर आहेत त्यामुळे गृह खरेदी आज रोजी सर्वात फायदेशीर आहे.

पुढील लेखामध्ये आपण मॅक्रो / दीर्घ इकॉनोमिक घटकांपैकी लोकसंख्या वाढीचा परिणाम पाहूया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

Chapter : 4 गृहनिर्माण क्षेत्रावर परिणाम करणारे घटक (मॅक्रो / दीर्घ घटक) : जीडीपी

मित्रांनो

रियल इस्टेट क्षेत्रावर परिणाम घडवून आणण्यामध्ये मॅक्रो-इकॉनोमिक व मायक्रो-इकॉनोमिक म्हणजेच अनुक्रमे दीर्घ अर्थशास्त्रीय व सूक्ष्म अर्थशास्त्रीय घटकांचा प्रामुख्याने प्रभाव असतो.

प्रथमतः मॅक्रो इकॉनोमिक घटक आपण तपासूया.

यामध्ये सर्वप्रथम सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP (जीडीपी) चा प्रभाव पडतो. GDP (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट अर्थातच जीडीपी) म्हणजेच देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत मधील भागात सर्व वस्तू आणि सेवांची एकूण आर्थिक बेरीज.

GDP (जीडीपी) आणि गृहनिर्माण क्षेत्र हे आपसात जोडले गेलेले असून खर्चण्यायोग्य शिल्लक उत्पन्न, बाजारात येणारा पैसा, वाढणाऱ्या रोजगाराच्या संधी यामुळे जीडीपी वाढतो आणि त्या अनुषंगाने गृहनिर्माण क्षेत्रामध्ये वाढ होते. या विरुद्ध कॉर्पोरेट क्षेत्राची वाढ खुंटणे, नोकऱ्या कमी होणे, औद्योगिक उत्पादनामध्ये घट होणे आणि त्या अन्वये जीडीपी मध्ये घट होऊन गृहनिर्माण क्षेत्रा ची वाढ कमी होणे साहजिक असते.

पुढील लेखामध्ये आपण मॅक्रो / दीर्घ इकॉनोमिक घटकांपैकी इन्फ्लेशन म्हणजे चलनवाढीचा परिणाम पाहूया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

Chapter : 3 गृहनिर्माण क्षेत्राच्या विकासाचा घटनाक्रम

मित्रांनो

1947 नंतर काही मोजक्या असंघटित व कुशल विकासकांकडे तसेच शासनाने नियंत्रित केलेल्या कंत्राटदारांकडे नवीन शहरे निर्माण करण्याचे काम दिले गेले परंतु पारंपारिक व चुकीच्या पद्धतीने कामे केल्यामुळे गृहनिर्माण क्षेत्राची वाढ खुंटली.

1952 & 1960 मध्ये चंदीगड आणि गांधीनगर या दोन नवीन राजधान्या सुनियोजित शहरे म्हणून वसवल्या गेल्या ज्यामुळे गृहनिर्माण क्षेत्राची मागणी जोर धरू लागली

1976 मध्ये तत्कालीन सरकारने अर्बन लँड सिलिंग व नियंत्रण कायदा अमलात आणला जेणेकरून मोजक्या श्रीमंत जागा मालकांकडे जागेचे ध्रुवीकरण टाळले जावे. परंतु शहरी भागात जागेची अपुरी उपलब्धता असल्यामुळे गृहनिर्माण क्षेत्रात पायाभूत विकसन करणे सरकारला अवघड जाऊ लागले म्हणून बऱ्याचशा राज्यांमध्ये हा कायदा रद्द करण्यात आला.

1980 मध्ये वाढत्या औद्योगीकरणामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्यामुळे, माहिती तंत्रज्ञानाच्या उदयामुळे, तरुण पिढीकडे खर्चण्यायोग्य उत्पन्न शिल्लक राहिल्यामुळे, उच्च जीवन शैलीकडे वाटचाल केल्यामुळे तसेच 1990 नंतर आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांची थेट परकीय गुंतवणूक गृहनिर्माण क्षेत्रामध्ये झाल्यामुळे या क्षेत्राला प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली.

1990 सॉफ्टवेअर क्षेत्रातील डॉट कॉम क्रॅश मुळे पायाभूत सुविधा व नियोजनाच्या अभावामुळे गृहनिर्माण क्षेत्राची प्रचंड मोठ्या प्रमाणावर पीछेहाट झाली आणि परकीय गुंतवणूक देशाच्या बाहेर माघारी जाण्यास सुरुवात झाल्यामुळे या क्षेत्राला जोराचा झटका बसला.

2000 मध्ये नव्याने उदयास येणाऱ्या सॉफ्टवेअर कंपन्यांनी स्वतःची मुख्यालये सर्व प्रमुख टेक सिटीज जसे की, बेंगलोर, हैदराबाद, पुणे व गुरगाव इत्यादी ठिकाणी स्थापन केल्यामुळे तरुण पिढीचा व त्या अनुषंगाने इतर सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा गृहनिर्माण क्षेत्राकडे ओढा निर्माण झाला.

2008 मध्ये बँकांनी हाउसिंग मॉर्गेज करण्यास सुरुवात केली त्यामुळे गृह कर्जाचा व्याजदर 15 टक्क्यावरून 8 टक्क्यावर आल्यामुळे घर खरेदीदारांचे सरासरी वय 40 वरून 30 वर आले. त्याच दरम्यान लेहमन ब्रदर्स या अमेरिकन वित्तीय संस्थेतील घोटाळा तसेच सब प्राईम मॉर्गेज घटनेमुळे गृहनिर्माण क्षेत्राला एक मोठा झटका मिळाला परंतु भारतातील गृहनिर्माण क्षेत्राला त्याचा मोठा दुष्परिणाम भोगावा लागला नाही आणि गृहनिर्माण क्षेत्र लवकरात लवकर त्यातून सावरू शकले.

2016 मध्ये ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी रेरा (RERA) म्हणजेच रियल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट, 2016 अमलात आणला गेला ज्यामुळे रियल इस्टेट क्षेत्र नियमन करण्यासाठी नियामक मंडळ तसेच विकासकावर जबाबदारी निश्चित करण्यासाठी नियमावली बनवण्यात आली. तसेच त्याच दरम्यान नोटबंदीमुळे या क्षेत्रावर मंदीचे सावट निर्माण झाले होते परंतु लवकरच गृहनिर्माण क्षेत्राने दमदार वापसी करून दाखवली.

2020 मध्ये कोविड च्या प्रादुर्भावामुळे गृहनिर्माण क्षेत्रावर पुन्हा एकदा मंदीचे पडसाद उमटू लागले होते परंतु सुरुवातीच्या किरकोळ धक्क्यानंतर या क्षेत्राने तितक्याच वेगाने पुन्हा एकदा स्वतःचा जम बसवला असून या क्षेत्रास लोकांनी प्रचंड वेगाने डोक्यावर घेतले आहे

2023 मध्ये या क्षेत्रामध्ये 30 टक्क्यांची वाढ दिसून आली असून येत्या काळामध्ये रियल इस्टेट क्षेत्राची नवीन सायकल उदयास येताना दिसत आहे त्यामुळे येणारे दशक हे रियल इस्टेट क्षेत्राचे असणार यात कोणतीही शंका नाही.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

Chapter : 2 रिअल इस्टेटचे प्रकार

मित्रांनो

रियल इस्टेट क्षेत्राचे मुखत्वे रेसिडेन्शियल / हाउसिंग / गृहनिर्माण, कमर्शियल, हॉस्पिटलिटी, रिटेल, ओपन लँड, वेअर हाऊसिंग अँड इंडस्ट्रियल असे मुख्य सहा प्रकार पडतात.

यापैकी गृहनिर्माण म्हणजेच हाउसिंग / रेसिडेन्शियल हा सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा प्रकार असून संपूर्ण रियल इस्टेट मार्केटच्या 80% शेअर याने व्यापतो.

आपण घरातून बाहेर निघालात की, मार्केटमध्ये मोठ-मोठाले फलक व बॅनर हे नेहमी रेसिडेन्शिअल प्रकल्पांचे दिसून येतात. आपण कोणतेही वर्तमानपत्र दररोज सकाळी पहा त्यात सर्वात पहिल्या पानावर रेसिडेन्शिअल प्रकल्पाचीच माहिती असते. रेसिडेन्शिअल किंवा हाऊसिंग म्हणजेच गृहनिर्माण गेल्या काही वर्षात अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र बनले आहे.

नॅशनल हाऊसिंग बोर्ड ने जवळपास 32 वित्तीय संस्थाना नोंदणी प्रमाणपत्र प्रदान केले असल्यामुळे भारतातल्या बहुसंख्य घर खरेदीदारांना गृह कर्ज मिळणे आणि त्यान्वये स्वप्नातील घर विकत घेणे सहज शक्य झाले आहे. त्याचबरोबर गृह कर्जाचे घटते व्याजदर आणि वेगवेगळ्या स्कीम्स तसेच सुलभ हप्त्यांच्या सोयीमुळे घर खरेदीदारांचा रेसिडेन्शिअल रियल इस्टेट क्षेत्राकडे ओढा वाढताना दिसून येत आहे.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

Chapter : 1 रिअल इस्टेटचा श्रीगणेशा

मित्रांनो

गरीब असो वा श्रीमंत, सर्वांनाच निवाऱ्याची गरज असते. डोक्यावर छत असणं ही अत्यंत सुखद भावना आहे आणि घर ही अशी वस्तू आहे की जी कधीही मागणी विना पडून रहात नाही.

2015 मध्ये रिअल इस्टेट मार्केट हे केवळ 126 अब्ज डॉलर एवढे होते, तर 2022 मध्ये 250 अब्ज डॉलरला भिडले आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार 2030 पर्यंत हे क्षेत्र एक ट्रिलियन डॉलर वर पोहोचण्याची शक्यता आहे. यावरून या क्षेत्राची महती समजून येते तसेच आजमितिला सर्वात जास्त रोजगार मिळवून देणारे क्षेत्र म्हणजेच बांधकाम क्षेत्र होय.

भारताच्या सकल आर्थिक उत्पन्न (GDP) च्या 7 टक्के भरणा एकट्या रिअल इस्टेट क्षेत्रातून येतो आणि तो 2040 पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे. वाढते शहरीकरण, रोजगाराच्या निर्माण झालेल्या संधी, खर्च जाता खर्चण्यायोग्य शिल्लक कमाई, तसेच राहण्याच्या क्षेत्रातील वाढत्या गरजा आणि लोकांच्या राहण्यासंदर्भातल्या बदलत्या आवडीनिवडी यामुळे या क्षेत्रात कायमच नवीन संधी उपलब्ध होत आहेत.

देशाच्या पायाभूत संरचना आणि आर्थिक विकासास प्रचंड वेगाने गती देण्याचे काम बांधकाम क्षेत्र करत असून येणाऱ्या दशकामध्ये या क्षेत्राची सर्वात वेगवान गतीने होणाऱ्या क्षेत्रांमध्ये गणना होईल. कदाचित त्याचमुळे स्थानिक लोकांसोबतच अनिवासी भारतीय आणि मोठ-मोठ्या कार्पोरेट कंपन्या देखील जमीन व रियल इस्टेट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा ओतत आहेत.

त्यामुळे या आर्थिक विकासामध्ये आपण सुद्धा स्वतःची आर्थिक प्रगती करून घेणे अत्यंत उपयुक्त ठरते, कारण मोकळी जागा व बांधीव घरे यांची मागणी ही कायमच वाढत जाणार असून घर विकत घेणे असो अथवा भाड्याने घेणे असो राहायला घर असणे ही अत्यंत आवश्यक बाब बनली आहे.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

संपर्क

कस्टमर हेल्पलाईन :
कार्यालयाचा पत्ता :

शॉप नं. 6, 7 & 8, गणेश पूजा कॉम्प्लेक्स,
बार्शी नाका, तांबरी विभाग,
धाराशिव – 413 501
(02472) 223 094

ई-मेल :

फॉलो करा

© 2023 – Manjiri Properties. All rights reserved.

Developed by RB Softwares