Chapter : 60 घर खरेदी करताना काय करावे ?

मित्रांनो

44. करारनामा नोंदणीकृत करण्यापूर्वी त्या करारनाम्याचा मसुदा बिल्डर कडून ईमेल द्वारे मागून घ्यावा व त्याचा अभ्यास स्वतः किंवा तज्ञ वकिलामार्फत करावा.

45. टेक्निकल व लीगल माहिती असणाऱ्या तज्ञ व्यक्तीकडून आवश्यक असेल तर नक्की सल्ला घ्यावा व सदरील दस्त तपासून घ्यावा.

46. फ्लॅट / रो हाऊस च्या कार्पेट एरिया चा उल्लेख स्पष्टपणे त्या दस्तात करायला हवा तसेच इनक्लोज बाल्कनी व टेरेस एरियाचा स्पष्ट उल्लेख त्यात केलेला असायला हवा.

47. प्रकल्पाच्या ताब्याची मुदत किंवा तारीख करारनाम्यात स्पष्टपणे उल्लेखलेली हवी तसेच ताबा देण्यास उशीर झाल्यास नुकसान भरपाईचा दस्तात उल्लेख केलेला हवा.

48. मेन्टेनन्स व डिपॉझिट खर्चाच्या रक्कमेबाबत स्पष्टपणे उल्लेख सदरील खरेदी दस्तात असावा.

49. दस्त एक्झिक्युशन / निष्पादित केल्यानंतर लगेचच सब रजिस्ट्रार कार्यालयात रजिस्टर्ड नोंदणीकृत करून घ्यावा.

50. दस्त नोंदणी झाल्यानंतर जर बिल्डर सोसायटी बनवून देणार असेल तर त्याबाबत आग्रही असावे आणि जर सोसायटी तयार होणार नसेल तर नगरपालिकेच्या दप्तरी 8A उताऱ्यावर तसेच उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात पीआर (PR) कार्डवर नाव नोंदणीची प्रक्रिया पार पाडावी.

51. फ्लॅट / रो हाऊस चा ताबा घेण्यापूर्वी सदरील इमारतीस नगरपालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे काय हे जरूर तपासावे व त्यानुसार पझेशन लेटरद्वारे लेखी स्वरूपात मालमत्तेचा ताबा बिल्डर कडून घ्यावा.

52. ताबा घेण्यापूर्वी खरेदीखतामध्ये नमूद नियम तसेच अटी शर्तीनुसार ठरलेल्या फिटमेंट्स व अमेनिटीज बिल्डरने प्रदान केलेल्या आहेत काय हे सर्व तपासावे व केल्या नसल्यास गुणवत्तेबद्दल आग्रही राहावे.

53. कृपया ग्राहकाने हे लक्षात ठेवावे की 50 टक्क्यांपेक्षा जास्त युनिट्स ची विक्री / खरेदीखत पूर्ण झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत सोसायटी बनवणे हे बिल्डरसाठी अनिवार्य आहे त्यानंतर सुद्धा बिल्डरने सोसायटी बनवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नसेल तर सदरील प्लॉट चा डीम्ड कन्वेयंस करून घेण्यासाठी युनिट्स धारक / ग्राहक यांनी आग्रही असणे आवश्यक आहे

क्रमशः

उर्वरित बाबी पुढील लेखात पाहूया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

Chapter : 59 घर खरेदी करताना काय करावे ?

मित्रांनो

35. फ्लॅट / रो हाऊस मध्ये वापरलेल्या किचन, सिंक, नळ, कमोड, वॉश बेसिन, सॅनिटरी फिटिंग, प्लंबिंग, इ. दर्जेदार ब्रँड चे वापरले आहेत का या सर्वांची माहिती घ्यावी तसेच त्या प्रोडक्ट्स च्या वॉरंटी बद्दल विचारणा करावी.

36. फ्लॅट / रो हाऊस ची रिसेल व्हॅल्यू काय असू शकेल याची चाचपणी करावी तसेच वेळ आलीच तर पुढे भविष्यात ही मालमत्ता विनाअडचण विकली जाईल का याचा विचार करावा.

37. ज्या प्लॉटवर इमारत बांधली गेलेली आहे त्याचा 7/12 उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड (PR Card) जागेचे मालक किंवा धारक म्हणून नाव असलेल्या व्यक्तींच्या नावे आहे काय हे अवश्य पहावे.

38. जर कुलमुखत्यारपत्र / पॉवर ऑफ अटॉर्णी एखाद्या विकासकास दिले गेलेले असेल तर ते डॉक्युमेंट सब रजिस्ट्रार कार्यालयात रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे.

39. ज्या जागेवर इमारत बांधली गेलेली आहे ती जागा विकासाच्या प्रत्यक्ष ताब्यात आहे काय हे जरूर तपासावे.

40. बांधकामाचे नकाशे नगरपालिका किंवा नियोजन प्राधिकरणाकडून मंजूर केले गेलेले आहेत काय हे जरूर तपासावे.

41. आपण जो फ्लॅट / रो हाऊस बुक करू पाहात आहात तो संमत नकाशामध्ये नमूद केलेला आहे काय याची खात्री करावी.

42. सदरील फ्लॅट किंवा रो हाऊस विभागणी केलेला नाही ना याची खात्री करावी.

43. जागेबाबत अर्बन लँड सिलिंग ची एखादी ऑर्डर असल्यास त्यावरील अटी शर्ती तपासाव्यात.

क्रमशः

उर्वरित बाबी पुढील लेखात पाहूया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

Chapter : 58 घर खरेदी करताना काय करावे ?

मित्रांनो

29. मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी आजूबाजूला सदरील मालमत्तेसारख्या इतर मालमत्ता कोणत्या दराने यापूर्वी विकल्या गेलेल्या आहेत हे माहीत करून घ्यावे. तसेच मालमत्तेचा आकार, वय, कंडिशन आणि ठिकाण या सर्व बाबी ध्यानात घेऊन बिल्डरकडून त्याचा ऑफर रेट सर्वप्रथम माहिती करून घ्यावा.

30. ऑफर रेट सोबत इतर सर्व खर्च जसे की स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फीस, जीएसटी, मेंटेनन्स, डिपॉझिट्स, इ. ची इत्यंभूत माहिती घ्यावी.

31. विचारपूर्वक स्वतःची पहिली ऑफर बिल्डरकडे सांगावी. बिल्डर त्यावर विचार करेल तसेच स्वतःची काउंटर ऑफर ग्राहकाला सांगेल ती नमूद करावी.

32. ऑफर रेट बद्दल घासाघीस / निगोशीएशन करण्याचा प्रयत्न करावा. मालमत्ता खरेदी करतेवेळी लगेचच उत्साह दाखवू नये. तत्पूर्वी बिल्डर सोबत व्यक्तिगत पर्सनल कनेक्शन व चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा. सर्व बाबी व सोयी सुविधा तसेच बिल्डर देत असलेल्या गुणवत्ता व निविष्ठा शांतपणे समजावून घ्याव्यात.

33. आपण दिलेल्या ऑफर बाबत बिल्डरची काउंटर ऑफर आपणास मान्य नसेल किंवा बजेटमध्ये बसत नसेल तर एखादा आठवडा थांबून पुनर्विचार करावा तसेच बिल्डरला अजून डिस्काउंट साठी आग्रह धरावा.

34. बुकिंग देणारा / मालमत्ता खरेदी करणारा स्थिरविचारी ग्राहक असेल आणि बिल्डरच्या आवाक्यातला काउंटर ऑफरचा रेट असेल तर बिल्डर व्यवहार पूर्ण करण्यासाठी शक्यतोवर नाही म्हणत नाहीत.

क्रमशः

उर्वरित बाबी पुढील लेखात पाहूया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

Chapter : 57 घर खरेदी करताना काय करावे ?

मित्रांनो

25. एनर्जी एफिशियन्सी बाबत बिल्डरने काय पावले उचलली आहेत तसेच 5 स्टार रेटिंग ची उपकरणे इन्सुलेशन सकट बसवली आहेत काय तसेच सोलार वॉटर हीटिंग सिस्टम, इ. उपलब्ध आहे काय हे जरूर तपासावे.

26. घराचे वय जरूर ध्यानात घ्यावे कारण जुन्या घराचा मेंटेनन्स हा त्रासदायक विषय ठरू शकतो. नवी इमारत असेल तर अतिशय उत्तम असते.

27. घराचा लेआउट व्यवस्थित तपासावा तसेच सामान स्टोरेज करण्यासाठी पुरेशी जागा जिन्याखाली तसेच माळ्यावर दिली गेलेली आहे का हे तपासावे.

28. मालमत्तेचा झोन दाखला जरूर तपासावा कारण R झोन मालमत्ताच केवळ विकसनयोग्य असतात. तसेच महसूल कायदे व नियम जसे की सिलिंग, महार वतन, कुलकर्णी वतन, कुळ, देवस्थान, इ. बाबींनी जमीन बाधित आहे काय हे तपासणे आवश्यक आहे.

क्रमशः

उर्वरित बाबी पुढील लेखात पाहूया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

Chapter : 56 घर खरेदी करताना काय करावे ?

मित्रांनो

20. बिल्डरने एखादी सॅम्पल प्रॉपर्टी तयार केली आहे का हे जरूर विचारावे व तशी प्रॉपर्टी तयार असल्यास किंवा एखाद्या प्रकल्पात एखादा रो हाऊस किंवा फ्लॅट इतर युनिट्स च्या तुलनेत पुढच्या स्टेज वर असल्यास त्यास जरूर भेट द्यावी.

21. मालमत्ता खरेदीच्या वेळी बिल्डिंग प्लॅन, स्ट्रक्चरल सेफ्टी रिपोर्ट, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, अर्बन लँड सीलिंग, बांधकाम आरंभ प्रमाणपत्र, टायटल डीड लिगल सर्च रिपोर्ट, भोगवटा प्रमाणपत्र, महारेरा नोंदणी प्रमाणपत्र, इ. प्रमाणपत्रांची तपासणी बिल्डरकडे अवश्य करावी.

22. प्रत्यक्ष बांधकामासंदर्भातील स्ट्रक्चरल इशूज जसे की जोत्याची गुणवत्ता, काँक्रीट आर.सी.सी. कामाची गुणवत्ता, फरशीची प्रमाणबद्धता, भिंतीला गेलेले तडे, भिंती, प्लास्टर, वॉल पुट्टी, इ. ची पाहणी एखाद्या तज्ञ साईट इंजिनियर करून घ्यावी.

23. छताची पाहणी व्यवस्थित करावी जेणेकरून पाण्याची गळतीची शक्यता टाळता येते तसेच भविष्यात होणारा रिपेअर चा खर्च टाळला जाऊ शकतो.

24. इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग सिस्टम अवश्य तपासाव्या तसेच अर्थिंग बरोबर केले आहे काय याची तपासणी करावी.

क्रमशः

उर्वरित बाबी पुढील लेखात पाहूया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

Chapter : 55 घर खरेदी करताना काय करावे ?

मित्रांनो

14. तुम्ही रो हाऊस किंवा फ्लॅट खरेदी करणार असाल तर साईट व्हीजिट वेळी त्या मालमत्तेचे फोटोग्राफ घेऊन इतर प्रकल्पांची त्यासोबत तुलना अवश्य करावी.

15. कोणतीही मालमत्ता ही जमिनीच्या व्यवहारासंदर्भात जोडली गेलेली असल्यामुळे सदरील प्रकल्पाचे लीगल टायटल स्वच्छ असणे गरजेचे आहे. त्यामुळे विकासकाकडे आवश्यक त्या सर्व परवानग्या, टायटल फ्लो, तसेच कोणत्याही प्रकारचा बोजा अथवा बँकेचे कर्ज व थर्ड पार्टी क्लेम इ. आहे किंवा नाही हे तपासणे आवश्यक असते. यासाठी आवश्यक कागदपत्रे विकासकाकडून घ्यावीत किंवा कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच मालमत्ता खरेदीचा विचार करावा.

16. सदरील मालमत्ता महारेरा नोंदणीकृत आहे का आणि असल्यास प्रकल्पाचे त्रैमासिक अहवाल सदरील विकासकाने महारेरा वेबसाईटवर अपलोड केले आहेत काय तसेच प्रकल्प नोंदणी वेळी अपलोड केलेले सर्व कागदपत्रांची मूळ प्रती बिल्डरकडे आहेत काय याची शहानिशा करणे गरजेचे आहे.

17. महारेरा वेबसाईट नुसार विकासकाने प्रकल्पाच्या ताब्याची प्रस्तावित तारीख नेमकी कोणती नमूद केली आहे ते आवश्यक तपासावे.

18. घर खरेदी करत असताना आपल्या पसंतीच्या ठिकाणासाठी आपण देत असलेली किंमत योग्य आहे का, कवर्ड कार पार्किंग चार्जेस, मेंटेनन्स, डिपॉझिट, मासिक मेंटेनन्स, रजिस्ट्रेशन कॉस्ट जसे की स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फीस, लीगल डॉक्युमेंट चार्जेस, तसेच वस्तू व सेवा कर (GST) इ. नेमके किती पडतील हे घर बुकिंग करत असताना बिल्डरकडून स्पष्टपणे माहिती करून घेणे आवश्यक आहे.

19. कोणत्याही दलाल किंवा ब्रोकर मार्फत बिल्डरकडे जाताना तो दलाल किंवा ब्रोकर महारेरा नोंदणीकृत आहे काय, तसेच त्या दलाल / ब्रोकर / रियल इस्टेट एजंट ची खरोखर गरज आहे काय हे माहीत करून घेणे हा प्रश्न स्वतःस विचारणे आवश्यक आहे. कारण ब्रोकर्सना कमीत कमी 1 ते 2 % एवढे ब्रोकरेज द्यावे लागते त्यापेक्षा बिल्डरच्या साईट तसेच ऑफिसवर जाऊन प्रत्यक्ष माहिती घेणे कधीही सोयीचे ठरतेे.

क्रमशः

उर्वरित बाबी पुढील लेखात पाहूया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

Chapter : 54 घर खरेदी करताना काय करावे ?

मित्रांनो

8. आपणास आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधा जसे की रूम्सची संख्या, कार्पेट एरिया, प्रकल्पाचे ठिकाण, तसेच इतर सुविधा जसे की स्विमिंग पूल, जिम, व्ययक्तिक टेरेस, सीसीटीव्ही कॅमेरा सिस्टम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, इ. ची यादी बनवावी आणि त्यानुसार घर शोधण्याची प्रक्रिया सुरू करावी.

9. आपल्या गरजेनुसार आपण स्वतःच्या वापराकरता मालमत्ता घेत आहात की केवळ गुंतवणूक म्हणून घेत आहात याची स्पष्टता मनामध्ये असणे अत्यावश्यक आहे.

10. बांधकामाधीन म्हणजेच अंडर कन्स्ट्रक्शन प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणे अत्यंत सोपे तसेच स्वस्त असते. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी 5 ते 10 लाख रुपयांनी मालमत्ता महाग मिळू शकते.

11. जर तुम्ही पहिल्यांदा घर खरेदी करणार असाल तर घराचे बजेट निश्चित करावे तसेच बँकेकडून जाणून घ्यावे की तुमच्या सध्याच्या पगारावर किती गृहकर्ज मंजूर होवू शकेल.

12. तुमच्या सोयीनुसार ठिकाण आणि बजेट याचा समतोल तपासावा. तसेच प्रत्यक्ष साईट व्हीजिट करून लोकेशनची तपासणी करावी.

13. नेहमी भविष्यातील गरजा लक्षात घेऊनच घर खरेदीचा निर्णय घ्यावा. भविष्यात आपल्या कुटुंबाचा विस्तार होऊ शकतो त्यामुळे त्यानुसार रूम्सची संख्या तसेच प्रकल्पाचे सोयीचे ठिकाण या बाबी ध्यानात ठेवून विचारपूर्वक निवड करावी.

क्रमशः

उर्वरित बाबी पुढील लेखात पाहूया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

Chapter : 53 घर खरेदी करताना काय करावे ?

मित्रांनो

घर भाड्याने घ्यावे की खरेदी करावे याबाबत मनामध्ये कितीही संभ्रम असला तरी घर ही अत्यंत निकडीची व अत्यावश्यक बाब आहे, जिथे आपण राहतो, कुटुंबाचे पालन पोषण करतो, घरासोबत आठवणी जोडतो, तसेच येणाऱ्या पिढीसाठी अमूल्य ठेवा तयार करतो.

त्यामुळे घर घेणे हे क्रमप्राप्त असल्यामुळे घर विकत घेताना नेमके काय करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन ग्राहकांनी घेणे गरजेचे आहे जेणेकरून घर केव्हा, कुठे व कसे घ्यावे याबाबत सजग निर्णय घेता येणे शक्य होते.

1. घर घेताना कोणाच्याही दबावाखाली किंवा फक्त मालमत्ता हवी या चुकीच्या समजापोटी घेणे टाळावे.

2. प्रत्येक व्यक्तीने घर विकत घेण्याबाबत सकारात्मक व नकारात्मक बाबी तसेच होणारे फायदे व परिणाम याचा सखोलवार विचार करून मगच निर्णय घ्यावा.

3. घर विकत घेण्याची वेळ ही आपली वैयक्तिक बाब असली तरीही आपण त्या शहरांमध्ये नेमक्या कोणत्या काळासाठी स्थिरावणार आहोत तसेच आपला नोकरी व व्यवसाय एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बदलत्या स्वरूपाचा आहे का हे पाहणे आवश्यक ठरते.

4. आपण जर नुकतेच करिअर सुरू केले असेल आणि नोकरी किंवा व्यवसायामध्ये जेमतेम एक ते दोन वर्ष झाली असतील तर घर विकत घेण्यापेक्षा भाड्याने घेणे सुयोग्य असते.

5. सामान्यतः वयाच्या 28 ते 30 वर्षांपर्यंत आपण नोकरी व व्यवसायामध्ये व्यवस्थित स्थिरावतो त्यामुळे जर आपण वयाची तिशी ओलांडली असेल तर घर विकत घेण्याचा विचार आपण गांभीर्यपूर्वक करावा.

6. आपण विकत घेत असलेल्या मालमत्तेची किंमत 100 रुपये असेल तर त्यापैकी 80 टक्के रक्कम बँकेच्या कर्जातून प्राप्त होऊ शकते त्यामुळे कमीत कमी 20 टक्के रक्कम ही डाऊन पेमेंट म्हणून आपल्या स्वतःच्या बचत खात्यात असणे अत्यावश्यक आहे.

7. आपली मासिक खर्च जाता आपल्याकडे जेवढी सरप्लस रक्कम शिल्लक राहते त्या रकमेमधून बँक लोनचा हप्ता (EMI) अदा करणे आपणास शक्य असेल तरच घर विकत घेण्याचा विचार करावा.

क्रमशः

उर्वरित बाबी पुढील लेखात पाहूया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

Chapter : 52 Buy (खरेदी) Vs. Rental (भाड्याने)

मित्रांनो

घर भाड्याने घेण्याबाबत नकारात्मक बाबी खालील प्रमाणे आहेत.

1. दरवर्षी भाडेवाढ 10 % दराने वाढल्यामुळे घरभाडे हाताबाहेर गेल्यासारखे वाटतात आणि राहण्याची गरज निरंतर असल्यामुळे परिस्थिती हतबल झाल्यासारखी वाटते.

2. भाडेकरू केवळ मर्यादित काळासाठी त्या जागेत भाड्याने राहत असल्यामुळे जागा मालकांच्या अटी शर्तीनुसार तसेच घालून दिलेल्या मर्यादानुसार राहावे लागत असल्यामुळे भाड्याने राहणे तितकेसे सुखावह राहत नाही.

3. एखाद्या ठिकाणी भाड्याने बरीच वर्ष राहिल्यानंतरही आपण त्याला स्वतःचे घर म्हणू शकत नाही कारण कोणतेही कायदेशीर अधिकार आपणास प्राप्त होत नाहीत.

4. भाड्याच्या घरावर कोणत्याही प्रकारचे बँकेचे लोन आपण घेवू शकत नाहीत.

5. दिवसेंदिवस मालमत्तांच्या किमती वाढल्यामुळे काही वर्षानंतर घर घेण्याची इच्छाशक्ती / क्षमता कमी होत जाते.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

Chapter : 51 Buy (खरेदी) Vs. Rental (भाड्याने)

मित्रांनो

घर भाड्याने घेण्याबाबत सकारात्मक बाबी खालील प्रमाणे आहेत.

1. भाड्याने घर घेण्यामुळे आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे अत्यंत सोयीचे होते तसेच बदलीची नोकरी असल्यास स्थलांतर सोपे पडते.

2. भाड्याच्या घराचा मेंटेनन्स चार्ज (मोठी सोसायटी असल्यास घरमालक भरतो) भाडेकरूस भरावा लागत नाही.

3. नगरपालिकेची घरपट्टी, नोंदणी फीस, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी, इ. खर्च करण्याची गरज पडत नाही. केवळ सिक्युरिटी डिपॉझिट अदा केल्यानंतर मासिक भाडे हा केवळ एवढाच विषय शिल्लक राहतो.

4. बँकेच्या हप्त्यांची काळजी करण्याची गरज भासत नाही.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

संपर्क

कस्टमर हेल्पलाईन :
कार्यालयाचा पत्ता :

शॉप नं. 6, 7 & 8, गणेश पूजा कॉम्प्लेक्स,
बार्शी नाका, तांबरी विभाग,
धाराशिव – 413 501
(02472) 223 094

ई-मेल :

फॉलो करा

© 2023 – Manjiri Properties. All rights reserved.

Developed by RB Softwares