मित्रांनो
गरीब असो वा श्रीमंत, सर्वांनाच निवाऱ्याची गरज असते. डोक्यावर छत असणं ही अत्यंत सुखद भावना आहे आणि घर ही अशी वस्तू आहे की जी कधीही मागणी विना पडून रहात नाही.
2015 मध्ये रिअल इस्टेट मार्केट हे केवळ 126 अब्ज डॉलर एवढे होते, तर 2022 मध्ये 250 अब्ज डॉलरला भिडले आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार 2030 पर्यंत हे क्षेत्र एक ट्रिलियन डॉलर वर पोहोचण्याची शक्यता आहे. यावरून या क्षेत्राची महती समजून येते तसेच आजमितिला सर्वात जास्त रोजगार मिळवून देणारे क्षेत्र म्हणजेच बांधकाम क्षेत्र होय.
भारताच्या सकल आर्थिक उत्पन्न (GDP) च्या 7 टक्के भरणा एकट्या रिअल इस्टेट क्षेत्रातून येतो आणि तो 2040 पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे. वाढते शहरीकरण, रोजगाराच्या निर्माण झालेल्या संधी, खर्च जाता खर्चण्यायोग्य शिल्लक कमाई, तसेच राहण्याच्या क्षेत्रातील वाढत्या गरजा आणि लोकांच्या राहण्यासंदर्भातल्या बदलत्या आवडीनिवडी यामुळे या क्षेत्रात कायमच नवीन संधी उपलब्ध होत आहेत.
देशाच्या पायाभूत संरचना आणि आर्थिक विकासास प्रचंड वेगाने गती देण्याचे काम बांधकाम क्षेत्र करत असून येणाऱ्या दशकामध्ये या क्षेत्राची सर्वात वेगवान गतीने होणाऱ्या क्षेत्रांमध्ये गणना होईल. कदाचित त्याचमुळे स्थानिक लोकांसोबतच अनिवासी भारतीय आणि मोठ-मोठ्या कार्पोरेट कंपन्या देखील जमीन व रियल इस्टेट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा ओतत आहेत.
त्यामुळे या आर्थिक विकासामध्ये आपण सुद्धा स्वतःची आर्थिक प्रगती करून घेणे अत्यंत उपयुक्त ठरते, कारण मोकळी जागा व बांधीव घरे यांची मागणी ही कायमच वाढत जाणार असून घर विकत घेणे असो अथवा भाड्याने घेणे असो राहायला घर असणे ही अत्यंत आवश्यक बाब बनली आहे.
मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678