मित्रांनो
बिल्डरने फ्लॅट / रो हाऊस ची विक्री करताना प्रकल्प कधी पूर्ण होणार आणि काही कारणास्तव प्रकल्प पुर्णत्वास विलंब होणार असल्यास सदर प्रकल्प किती कालावधीत पूर्ण होणार हे खरेदीदारांस रेरा कायद्यानुसार स्पष्टपणे उघड करावयाचे आहे.
इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 मध्ये नमूद ‘डॉक्ट्रीन ऑफ फ्रस्ट्रेशन’ म्हणजेच ‘निराशेचा सिद्धांतास’ बदलवून ‘फोर्स मेजर’ चा समावेश मोफा तसेच रेरा कायद्यात करण्यात आला.
फोर्स मेजर म्हणजे अश्या घटना ज्या सामान्यतः बिल्डरच्या / कोणत्याही सामान्य मनुष्याच्या नियंत्रणाच्या पलीकडे असतात.
ज्यामध्ये असधारण परिस्थिती जसे की चक्रीवादळ, आग, पूर, युद्ध, भूकंप, सुनामी किंवा दुष्काळ अशा परिस्थितीमध्ये महारेरा कायद्याच्या कलम 6 मध्ये बिल्डरांनी करावयाच्या कार्यवाहीची नियमावली स्पष्ट करण्यात आली.
मध्यंतरी कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे ताब्यासाठी विलंब झालेल्या प्रकल्पांना देखील शासनाने 9 महिन्यांच्या प्रकल्पाच्या नोंदणीबद्दल सवलत दिली होती तसेच उशिरा ताब्यासाठीच्या दिल्या जाणाऱ्या व्याजावर संपूर्ण सवलत दिली होती.
फोर्स मेजर क्लॉज अस्तित्वात आल्यापासून 1 महिन्याच्या आत बिल्डरने ग्राहकाच्या निदर्शनास अशी परिस्थिती आणून द्यायला हवी आणि त्यामुळे जोपर्यंत फोर्स मेजर परिस्थिती पूर्वपदास येत नाही तोपर्यंत थांबलेले बांधकाम ताब्यासाठी विलंबाचा कालावधी तेवढ्या दिवसांसाठी पुढे ढकलला गेला आहे असे मानले जाते.
परंतु अशी इमर्जन्सी परिस्थिती / फोर्स मेजर परिस्थिती दूर झाल्यानंतर बिल्डरने विहित वेळेत प्रकल्प पूर्ण करून ग्राहकाला घराचा ताबा देणे रेरा कायद्यान्वये बंधनकारक आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये बिल्डर फोर्स मेजर कारणांमुळे सदरील प्रलंबित प्रकल्प कायमचा सोडून देऊ शकत नाही.
पुढील लेखात आपण ‘प्रोजेक्ट मेंटेनन्स’ बाबत माहिती घेऊया.
मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678