मित्रांनो
केवळ फ्लॅट / रो हाऊस विकणे एवढेच महत्त्वाचे नसून विक्री पश्चात सेवा देखील तेवढेच महत्त्वाचे असते हे रेरा कायद्याने दाखवून दिले आहे.
कोणत्याही बांधकामातील स्ट्रक्चरल डिफेक्ट म्हणजेच कामाच्या गुणवत्तेबाबत केलेल्या कुचराईचे निराकरण स्वखर्चाने करून देणे हे बिल्डरचे आद्य कर्तव्य आहे.
यापूर्वी बिल्डरने ताबा दिल्यापासून वर्कमनशिप मधील स्ट्रक्चरल डिफेक्ट दूर करण्यासाठी १ वर्षाचा अवधी दिलेला होता.
महारेरा कायद्यानुसार हा अवधी आता 5 वर्षाचा करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार ग्राहकाने स्ट्रक्चरल डिफेक्ट दाखवून दिलेल्या दिवसापासून 30 दिवसाच्या आत सदरील बांधकामातील त्रुटी दूर करून समस्यांचे निराकरण करणे बंधनकारक आहे.
याबाबत ‘स्ट्रक्चरल डिफेक्ट लायाबिलिटी’ चा क्लॉज एग्रीमेंट फॉर सेल मध्ये नमूद करणे बंधनकारक आहे.
पुढील लेखात व्याजदराबद्दल माहिती घेऊया.
मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678