मित्रांनो

रेरा कायद्यानुसार गृह खरेदीदारांकडून घेतलेल्या एकूण रकमेपैकी सुमारे 70% रक्कम ‘रेरा डेसिग्नेटेड बँक अकाउंट’ अशा शीर्षाखालील स्वतंत्र ‘एस्क्रो अकाउंट’ मध्ये ठेवणे बंधनकारक आहे.

उदा. समजा एखाद्या ग्राहकाकडून Rs.1,00,000/- रुपये बिल्डरला मिळाले तर ते पैसे सुरुवातीला 100% कलेक्शन अकाउंट ला गोळा केले जातात. त्यानंतर त्या दिवसाच्या रात्री 12 वाजता ते पैसे दोन भागात स्प्लिट होवून 70% म्हणजेच Rs.70,000/- ‘रेरा डेसिग्नेटेड बँक अकाउंट’ मध्ये जमा होतात आणि उर्वरित 30% म्हणजेच Rs.30,000/- बिल्डरच्या ‘रेग्युलर करंट अकाउंट’ ला जमा होतात.

बिल्डर्स घर खरेदीदारांकडून बांधकामाच्या टप्प्यानुसार पैसे घेतील आणि कमीत कमी 70% रक्कम ही फक्त आणि फक्त त्या प्रकल्पाच्या बांधकामासाठीच वापरतील या अपेक्षेने ‘एस्क्रो अकाउंट’ संकल्पना करण्यात आली.

सदरील 70% रेरा डेसिग्नेटेड बँक अकाउंट मधून पैसे काढण्यासाठी / प्रकल्पासाठी वापरण्यासाठी आर्किटेक्ट चे प्रमाणपत्र (फॉर्म-1), साईट इंजिनियर चे प्रमाणपत्र (फॉर्म-2), चार्टर्ड अकाउंटंट (CA) चे प्रमाणपत्र (फॉर्म-3) बँकेला देणे बंधनकारक आहे.

सदरील बँक अकाउंट हे केवळ शेड्युल्ड बँकेत असणे आवश्यक आहे. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर सदरील बँक खात्याचे चार्टर्ड अकाउंटंट कडून ऑडिट करून सदरील ऑडिट रिपोर्ट महारेरा प्राधिकरणाकडे जमा करणे बिल्डरला बंधनकारक आहे.

सदरील 70 % रेरा डेसिग्नेटेड बँक अकाउंट ची माहिती एग्रीमेंट फॉर सेल मध्ये देणे बिल्डरला बंधनकारक आहे. तसेच एका प्रकल्पासाठी केवळ एक रेरा बँक अकाउंट असावे हे देखील बंधनकारक आहे.

पुढील लेखात आपण ‘स्ट्रक्चरल डिफेक्ट लायबिलिटी’ बद्दल जाणून घेऊया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

संपर्क

कस्टमर हेल्पलाईन :
कार्यालयाचा पत्ता :

शॉप नं. 6, 7 & 8, गणेश पूजा कॉम्प्लेक्स,
बार्शी नाका, तांबरी विभाग,
धाराशिव – 413 501
(02472) 223 094

ई-मेल :

फॉलो करा

© 2023 – Manjiri Properties. All rights reserved.

Developed by RB Softwares