मित्रांनो
फ्लॅट / रो हाऊस चा कार्पेट एरिया निश्चित करत असताना बिल्डर बऱ्याच फसव्या अटी शर्ती वापरतो आणि खरेदीदार गोंधळात पडून अज्ञानापोटी स्वतःचे नुकसान करून घेतो.
सामायिक वापराची क्षेत्रे जसे की स्विमिंग पूल, फुटपाथ, लिफ्ट, जिम्नॅशियम, क्लब हाऊस, बाह्य वापराचा जिना हा रेरा कार्पेट एरिया चा भाग मानला जात नाही.
विशेष व्हरांडा आणि इनक्लोज बाल्कनी क्षेत्र जरी फ्लॅट / रो हाऊस ला कायमस्वरूपी जोडलेले असले तरीही तो रेरा कार्पेट एरिया चा भाग मान्य होत नाही.
ओपन टेरेस एरिया जरी फ्लॅट किंवा रो हाऊस शी संलग्न आहे परंतु रेरा कार्पेट एरिया चा भाग होत नाही.
समजा लोडिंग फॅक्टर 1:20 आहे तर असे समजावे की बिल्डरने कार्पेट एरियामध्ये 20 % लोडिंग परीगणित केलेले आहे.
सामान्यतः निवासी प्रकल्पांमध्ये बिल्डर्स ने सांगितलेला प्रति चौरस फूट दर हा विक्री योग्य क्षेत्र बिल्टअप किंवा सुपर बिल्टअप क्षेत्राचा दर असतो मात्र रेरा च्या नियमानुसार फक्त रेरा कार्पेट एरियानुसारच दर दिला जावा असे नवीन नियमावलीत नमूद केलेले आहे.
त्यामुळे बिल्डरला रेरा कार्पेट एरिया व बिल्टअप / सुपर बिल्टअप क्षेत्राच्या गुणोत्तराबद्दल विचारले पाहिजे. गुणोत्तर जितके जास्त तितकीच फ्लॅट / रो हाऊस च्या आतील वापरण्यायोग्य जागा जास्त मिळते.
पुढील लेखात आपण रेरा कार्पेट एरिया चे फायदे आणि परिणाम जाणून घेऊया.
मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678