मित्रांनो
बिल्टअप एरिया म्हणजे फ्लॅट / रो हाऊस च्या बाहेरच्या भिंतीच्या पृष्ठभागावरून मोजले जाणारे त्या फ्लॅट रो हाऊस चे क्षेत्रफळ होय.
त्यात मूलतः असणारा कार्पेट एरिया आणि भिंतीची जाडी यांचा समावेश होतो तसेच काही बिल्डर्स यामध्ये ड्राय बाल्कनी, ओपन टेरेस, फ्लावर बेड, इ. चाही समावेश करत होते.
बिल्टअप एरिया = कार्पेट एरिया + बाह्य भिंतीचे क्षेत्रफळ
कार्पेट एरियावर जवळपास 30 ते 35 टक्के लोडिंग फॅक्टर लावून बिल्टअप एरिया मोजला जातो.
सुपर बिल्टप एरिया म्हणजेच ज्यामध्ये कार्पेट एरिया सोबत भिंतीची जाडी, ओपन टेरेस, लिफ्ट, जिना, सर्विस शाफ्ट, डक्ट, बाल्कनी तसेच काही मोठ्या प्रकल्पांमध्ये गार्डन एरिया, स्विमिंग पूल, क्लब हाऊस या गोष्टींचा अंतर्भाव होतो.
कार्पेट एरियावर जवळपास 55% लोडिंग फॅक्टर लावून सुपर बिल्टअप एरिया मोजला जातो.
रेरा कार्पेट एरिया म्हणजेच ज्या मालमत्तेच्या जमिनीवर चटई अंथरली जाऊ शकते. म्हणजेच कार्पेट एरियामध्ये किचन हॉल, लिविंग रूम, मास्टर बेडरूम, बेडरूम, डायनिंग रूम, स्टडी रूम, अंतर्गत जिना, अंतर्गत भिंती फक्त इतकाच समावेश होतो.
इतर सर्व बाह्य भिंती, सर्विस शाफ्ट, स्पेशल बाल्कनी, वरंडा, ओपन टेरेस, डक्ट इत्यादी यातून वगळलेले असतात.
रेरा कार्पेट एरियाची मोजणी करत असताना खाजगी तांत्रिक मूल्यांकन कर्त्याची मदत घ्यावी. तसेच तुम्ही गृह कर्ज घेत असाल तर बँकेच्या कायदेशीर सल्लागाराला बांधकाम परवान्याचा तपशील तपासण्यास सांगावे.
पुढील लेखामध्ये आपण बांधकाम व्यवसायिकांकडून वापरला जाणाऱ्या फसव्या संज्ञांचा अभ्यास करूया.
मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678