मित्रांनो

रेरा कायद्यानुसार बिल्डरने ग्राहकाकडून एग्रीमेंट किमतीच्या 10% पेक्षा जास्त रक्कम बुकिंग वेळी घेता कामा नये.

बिल्डरला 10% पेक्षा जास्त रक्कम तेव्हाच स्वीकारता येते जेव्हा एग्रीमेंट फॉर सेल नोंदणीकृत होते.

एग्रीमेंट फॉर सेल ची नोंदणी झाल्यानंतर 20% आणि जोत्याचे (प्लिंथ) काम पूर्ण झाल्यानंतर 15% एवढीच रक्कम बिल्डरला ग्राहकांकडून घेता येते.

त्यानंतर पहिला व दुसरा स्लॅब, विटकाम, प्लास्टर, दरवाजे, खिडक्या, प्लंबिंग, इलेक्ट्रिफिकेशन, टायलिंग वर्क, पेंटिंग वर्क, इ. प्रत्येक बांधकामाच्या टप्प्यानंतर प्रत्येकी 5% ग्राहकांकडून घेतले जातात.

फ्लॅट / रो हाऊस चे सर्व बांधकाम पूर्ण होऊन सदरील इमारत राहण्यायोग्य तयार झाल्यावर / ऑक्यूपन्सी सर्टिफिकेट / भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर 60 दिवसांच्या आत घर खरेदीदाराला ताबा देणे बिल्डरवर बंधनकारक असते. सदरील मालमत्तेचा ताबा देताना उर्वरित 5% रक्कम ग्राहकांकडून घेतली जाते.

बांधकामाचा प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्यानंतर बिल्डर कडून ‘टॅक्स इन्व्हॉईस कम डिमांड नोटीस’ ग्राहकांना इश्यु केली जाते. त्यानंतर 7 दिवसांमध्ये ग्राहकाने आणि बँक लोन घेतले असेल तर बँकेने बिल्डरला पेमेंट करणे आवश्यक असते.

सदरील डिमांड नोटीस मध्ये बिल्डरने GST लावलेला असतो व ग्राहकाकडून त्याची वसुली झाल्यानंतर बिल्डर सदरील जमा केलेला GST हा तात्काळ GST रिटर्न द्वारे शासनाच्या कोषागारात जमा करतो व त्याची रीतसर पावती ग्राहकाला प्रदान करतो.

पुढील लेखात आपण संमत प्लॅन मध्ये सुधारणा बाबत माहिती घेऊया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

संपर्क

कस्टमर हेल्पलाईन :
कार्यालयाचा पत्ता :

शॉप नं. 6, 7 & 8, गणेश पूजा कॉम्प्लेक्स,
बार्शी नाका, तांबरी विभाग,
धाराशिव – 413 501
(02472) 223 094

ई-मेल :

फॉलो करा

© 2023 – Manjiri Properties. All rights reserved.

Developed by RB Softwares