मित्रांनो

आपल्या धाराशिव शहरामध्ये टेन्टेटिव्ह म्हणजेच तात्पुरत्या स्वरूपातील परवानगी नगरपालिकेकडून प्राप्त करून प्लॉट विकले जातात किंवा गुंठेवारी केलेल्या भूखंडांवर कोणत्याही प्रकारच्या बांधकाम परवानग्या न घेता बांधकाम करण्याचा व रो हाऊस / फ्लॅट विकण्याचा ट्रेंड पाहण्यात आला आहे, जे की, सर्वस्वी चुकीचे आणि बेकायदेशीर आहे.

कोणताही भूखंड नगरपालिका / नियोजन प्राधिकरणाची अंतिम संमती प्राप्त केल्याशिवाय कायद्यान्वये विकता येत नाही. मा. उच्च न्यायालयाने देखील याबाबत आदेश दिलेले आहेत परंतु सर्रास त्याची पायमल्ली होताना दिसते.

तसेच रो हाऊस / फ्लॅटच्या स्कीम देखील विशिष्ट बांधकाम परवाना न घेता विकसित केल्याचे बऱ्याच ठिकाणी आढळून आले आहे.

शासनाने यावर कारवाई केल्याचे अनेक प्रकार देखील दिसून आले आहेत. अशा परिस्थितीत खूप मोठ्या आर्थिक तसेच मानसिक त्रासास सामोरे जावे लागते. चार पैसे वाचवण्यासाठी व स्वस्त ठिकाणी घर मिळत आहे या भाबड्या आशेने आपण आयुष्यभराची पुंजी त्या प्रकल्पामध्ये लावत असतो परंतु खूप मोठी फसवणूक झाल्याचे नंतर लक्षात येते परंतु तोपर्यंत हातून वेळ निघून गेलेली असते.

त्यामुळे कोणताही प्रकल्प निवडताना त्या बिल्डरने प्रकल्पाच्या सर्व संमती, परवाने, आराखडे हे सुयोग्य नगरपालिका / नियोजन प्राधिकरणाकडून प्राप्त केले आहेत का हे तपासणे क्रमप्राप्त ठरते किंबहुना घर विकत घेणाऱ्याचा तो रास्त आणि वाजवी हक्क आहे.

पुढील लेखामध्ये आपण मायक्रो / सूक्ष्म इकॉनोमिक घटकांपैकी सोयी सुविधा / अमेनिटीज या घटकाचा परिणाम पाहूया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

संपर्क

कस्टमर हेल्पलाईन :
कार्यालयाचा पत्ता :

शॉप नं. 6, 7 & 8, गणेश पूजा कॉम्प्लेक्स,
बार्शी नाका, तांबरी विभाग,
धाराशिव – 413 501
(02472) 223 094

ई-मेल :

फॉलो करा

© 2023 – Manjiri Properties. All rights reserved.

Developed by RB Softwares