मित्रांनो
केवळ लोकेशन / ठिकाण चांगले असून चालत नाही तर शेजार चांगला असणेही तितकेच महत्त्वाचे असते. वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तीची मानसिकता त्याच्या आजूबाजूस राहणाऱ्या व्यक्ती व त्यांची मानसिकता सामाजिक व आर्थिक परिस्थिती व सौहार्दपूर्ण वागणूक यावर बऱ्याच अंशी अवलंबून असते.
हेच पहा की, आपण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घर घेतले आहे परंतु त्या घराच्या समोरच कायम गोंगाट आणि वर्दळ असणारा हमरस्ता किंवा हायवे किंवा एखादे मोटार गॅरेज असेल तर आपल्या घरामध्ये देखील कायम अस्वस्थता, बेचैनी, मानसिक आजार, इ. बळावू शकतात तसेच सतत भांडण व तंटा करत असणारे शेजारी असतील तर आपली मानसिकता देखील अशांत होऊन जाते.
त्यामुळे घर विकत घेताना प्रत्येक ग्राहकाने हे सुनिश्चित केले पाहिजे की आपण विकत घेत असलेले घर हे शक्यतो आतल्या रस्त्यावर, सुरक्षित ठिकाणी व निरोगी वातावरणात असावे.
पुढील लेखामध्ये आपण मायक्रो / सूक्ष्म इकॉनोमिक घटकांपैकी प्रकल्प आराखडे आणि परवाने या घटकाचा परिणाम पाहूया.
मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678