मित्रांनो
फ्लोअर प्लॅन म्हणजेच एखाद्या घरामध्ये किंवा प्रकल्पामध्ये रूम्सचा केलेला सुयोग्य वापर ज्यामध्ये किचन, मास्टर बेडरूम, लिविंग रूम बेडरूम, टॉयलेट, बाथरूम व बाल्कनी इत्यादींचा समानुपाती विचार करून मांडणी केलेली असते.
जसे की आपण बाल्कनी मध्ये जास्त वेळ घालवत नाही त्यामुळे 3 फूट रुंदी असलेली बाल्कनी सुद्धा पुरते. याविरुद्ध लिविंग रूम म्हणजेच हॉल कमीत कमी 180 चौरस फूट असणे अतिशय उत्तम असते जेणेकरून सामाजिक संवाद राखणे सोयीचे होते.
मास्टर बेडरूम मध्ये कपडे व इतर वस्तू ठेवण्यासाठी कपबर्ड / कपाट तसेच दोन वयस्क व्यक्तींसाठी पुरेशा आकाराचा बेड मावेल आणि थोडीशी जागा इतर हालचालींसाठी शिल्लक राहील अशा प्रकारची व्यवस्था अभिप्रेत असते.
किचनमध्ये देखील सिंक जवळ गॅस हॉब नसणे आणि किचन खिडकीच्या खाली गॅस हॉब असणे जेणेकरून धूर तात्काळ बाहेर टाकता येईल अशी रचना आवश्यक ठरते.
टॉयलेट बाथरूम ची देखील मांडणी अशा प्रकारे आवश्यक की जेणेकरून आंघोळीच्या पाण्यामुळे टॉयलेट च्या भांड्याच्या भोवताली चा परिसर कायम ओला राहणार नाही.
पुढील लेखामध्ये आपण मायक्रो / सूक्ष्म इकॉनोमिक घटकांपैकी व्हेंटिलेशन आणि लाइटिंग या घटकाचा परिणाम पाहूया.
मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678