मित्रांनो
घर ही केवळ चार भिंती आणि छत यांची सिमेंट काँक्रीट व वीट ने बनलेली इमारत नसून त्या घरामुळे तिथे राहणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्याला एक नवा अर्थ प्राप्त होतो.
अशा परिस्थितीत घराचा दर्जा, बांधकामाची गुणवत्ता, बिल्डरने दिलेल्या इतर सोयीसुविधा व अमेनिटीज याचा खूप मोठा परिणाम एकूणच राहणीमानावर होतो.
पाणी, वीजपुरवठा, सिक्युरिटी गार्ड, फायर एक्सटिंगविशर, लेटर बॉक्स ,स्वतंत्र मीटर, फॅन, ट्यूबलाईट, एक्झॉस्ट फॅन, किचन चिमणी, सोलर वॉटर हीटिंग सिस्टम, सीसीटीव्ही कॅमेरा सिस्टम, सिक्युरिटी गेट, बाग बगीचा व हिरवळ, बसण्यासाठी पुरेशी जागा, इ. मूलभूत गरजा बिल्डरांनी ग्राहकांना देणे आवश्यक आहे परंतु जास्तीत जास्त नफा कमवण्याच्या लालसेपोटी बिल्डर अशा गोष्टी देण्यास टाळाटाळ करतात.
ग्राहकांनी या सर्व गोष्टी कोणता बिल्डर सद्यस्थितीत ग्राहकांना पुरवत आहे याचा शोध घेतला पाहिजे व अधिकाधिक चांगल्या सुविधा बिल्डर कडून घेण्यासाठी आग्रह धरला पाहिजे.
जो बिल्डर लेखी स्वरूपामध्ये फिटमेंट चार्ट देत असेल त्या बिल्डरची निवड करणे अतिशय सुयोग्य आणि सार्थ ठरते.
पुढील लेखामध्ये आपण मायक्रो / सूक्ष्म इकॉनोमिक घटकांपैकी डिझाईन आणि अस्थेटीक्स या घटकाचा परिणाम पाहूया.
मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678