मित्रांनो
ब्लॉक ओरिएंटेशन म्हणजेच घरामध्ये कोणती रूम कुठे असावी याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास व मांडणी.
दोन खोलीतील अंतर, रूम मध्ये पुरेशी उपलब्ध जागा, ओपन स्पेस, घरातून दिसणारे बाहेरचे दृश्य तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजेच या मांडणीतून मिळणारा पुरेसा सूर्यप्रकाश व हवेशीर वातावरणाचा अनुभव की ज्यामुळे त्या घरी राहणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेवर प्रचंड मोठा सकारात्मक प्रभाव पडतो.
दक्षिण-पूर्व दिशेला बाल्कनी असणे म्हणजे हवेशीर वातावरणाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्या खालोखाल बाल्कनी पश्चिमेकडे असल्याने दिवसभर बाल्कनी मध्ये ऊन चांगले येते.
बाल्कनी उत्तरेकडे असल्यास आपण भारतात दक्षिण गोलार्धात राहत असल्यामुळे पुरेसा सूर्यप्रकाश दिवसभर राहत नाही. अशा घरांमध्ये जाळी-जळमटे, कुबट वास, अंधार व एकूणच नकारात्मक मानसिकता जास्त दिसून येते.
त्यामुळे घर विकत घेताना बिल्डरने ब्लॉक ओरिएंटेशन कडे पुरेसे लक्ष दिले आहे का हे वास्तुशास्त्रापेक्षा देखील जास्त महत्त्वाचे ठरते.
पुढील लेखामध्ये आपण मायक्रो / सूक्ष्म इकॉनोमिक घटकांपैकी फ्लोर प्लॅन या घटकाचा परिणाम पाहूया.
मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678