मित्रांनो

अतिशय चवीने आणि विचारपूर्वक बनवलेले प्रकल्प चोखंदळ ग्राहकांच्या मनास नक्कीच साद घालतात.

घराचा ताबा घेतल्यानंतर आपण जेव्हा त्या घरामध्ये स्थिरावतो तेव्हा तेव्हा आपण फक्त त्या घरात राहत नाही, तर ते घर आणि परिसर जगतो.

माणसाच्या मनावर घर व त्याची रंग-संगती, अलंकरण, पोत, अवकाश (स्पेस), सजावट, मांडणी व सुबकता यांद्वारे साधली जाणारी अखंडता याचा प्रचंड मोठा परिणाम होतो.

जेव्हा आपण घराचा ताबा घेतो तेव्हा आपल्या घरी वास्तुशांती व सत्यनारायण निमित्त पै-पाहुणे, मित्रमंडळी व नातेवाईक यांची रेलचेल चालू असते. आदर्श घर अशा नातेवाईक मित्रमंडळींना दाखवायला कोणाला आवडणार नाही.

समाजातील प्रतिष्ठा आणि मानसन्मान हा चांगल्या घरामुळे नक्कीच प्राप्त होतो. कदाचित ‘घरंदाज’ हा शब्द देखील यामुळेच सामाजिक चर्चांमध्ये प्रकर्षाने आढळून येतो.

त्यामुळेच महागडे घर घेऊन सुद्धा चांगले फर्निचर, इंटेरियर डेकोरेशन, पीओपी ची मांडणी व घरासमोर हिरवळ व बाग-बगीचा तयार करण्याकडे बहुतांश लोकांचा कल दिसून येतो.

पुढील लेखामध्ये आपण मायक्रो / सूक्ष्म इकॉनोमिक घटकांपैकी ब्लॉक ओरिएंटेशन / घरांची मांडणी या घटकाचा परिणाम पाहूया.

मंजिरी प्रॉपर्टीज
99-88-677-678

संपर्क

कस्टमर हेल्पलाईन :
कार्यालयाचा पत्ता :

शॉप नं. 6, 7 & 8, गणेश पूजा कॉम्प्लेक्स,
बार्शी नाका, तांबरी विभाग,
धाराशिव – 413 501
(02472) 223 094

ई-मेल :

फॉलो करा

© 2023 – Manjiri Properties. All rights reserved.

Developed by RB Softwares